Vidnyanvahini
 

सामान्य विज्ञान (General)

नोबेल पारितोषिक

8 Dec. 2020

नोबेल पारितोषिक

१० डिसेंबर या दिवसाला जागतिक स्तरावर फार महत्व आहे कारण या दिवशी निरनिराळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच संशोधन करणाऱ्या व्यक्तींना नोबेल पुरस्काराने सन्मानित केले जाते. काय आहे हा नोबेल पुरस्कार ? हा पुरस्कार केव्हापासून देण्यास सुरुवात झाली आणि ती कोणी केली ? असे काही प्रश्न तुम्हाला नक्कीच पडले असतील. चला तर मग... या नोबेल पुरस्काराची पार्श्वभूमी आपण समजून घेऊ या.

आल्फ्रेड बर्नहार्ड नोबेल

आल्फ्रेड बर्नहार्ड नोबेल यांचा जन्म २१ ऑक्टोबर १८३३ रोजी स्वीडनमधील स्टॉकहोम येथे झाला. १८४२ मध्ये आल्फ्रेडचे वडील कुटुंबासह सेंट पिट्सबर्ग येथे आले. तिथे त्यांनी नायट्रोग्लिसरीनच्या उत्पादनाचे काम सुरु केले. आल्फ्रेडने सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर रसायनशास्त्राचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. प्राध्यापक निकोलस झेनिन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हा अभ्यास पूर्ण केला. त्यानंतर अमेरिकेमध्ये जॉन एरिक्सनच्या हाताखाली त्यांनी रसायनशास्त्राचा पुढील अभ्यास केला. यांत्रिकी व अभियांत्रिकी मध्ये आपले मुख्य शिक्षण घेतले असले तरी त्यांना रसायनशास्त्रातील संशोधनाची खूप आवड होती. आल्फ्रेडचे वडील प्रसिद्ध उद्योगपती होते. काही वर्षे आल्फ्रेडने आपल्या वडिलांचा व्यवसाय सांभाळला. परंतु अचानक एक दुर्दैवी घटना घडली आणि आल्फ्रेडच्या वडिलबंधुंचा स्फोटकांच्या अपघातात मृत्यु झाला. त्यामुळे आल्फ्रेड ह्यांच्या कार्याला कलाटणी मिळाली व त्यांनी सुरक्षित स्फोटकांच्या संशोधनाला सुरुवात केली. त्यातच पुढे डायनामाइटचा शोध त्यांनी लावला. या शोधाची पण एक कहाणी आहे.

डायनामाईटचा शोध:

आपल्या संशोधनात त्यांनी नायट्रोग्लिसरीनसारखे स्फोटक तयार केले होते. हे स्फोटक थोड्याशा धक्क्यानेही स्फोट घडवणारे होते. ते सुरक्षित ठेवणे फार कठीण होते. अचानक त्या स्फोटकातला काही अंश खाली जमिनीवर पडला. खरं म्हणजे याक्षणी मोठा स्फोट होणे अपेक्षित होते, पण वेगळेच घडले ... जमिनीवर पडलेल्या अंशापासून एक प्रकारची पेस्ट तयार झालेली त्यांना दिसली व त्यांनी ह्या पेस्टचा काही भाग उचलला आणि त्याला चेंडूसारखा गोल आकार दिला. प्रयोगशाळेच्या बाहेर हे स्फोटक ते आणू शकले आणि त्यांना नायट्रोग्लिसरीन सुरक्षितपणे हाताळण्याची पद्धत सापडली. ह्यालाl त्यांनी डायनामाईट असे नांव दिले. नंतर त्यांनी डायनामाईट पेक्षा शक्तिशाली स्फोटक असे नायट्रोग्लिसरीनचे नवीन मिश्रण शोधून काढले . 1875 मध्ये त्यांनी नायट्रोजन आणि ग्लिसरीन यांच्या मिश्रणापासून बनविलेले हे स्फोटक डायनामाईट पेक्षा स्थिर म्हणजेच सुरक्षित होते. याला जेलीनाइट असे नांव दिले गेले.

नोबेल यांची इतर संशोधने:

काही वर्षांनी आल्फ्रेडने बॅलेस्टाइट हे धूर विरहित प्रोपेलंट शोधण्यात यश मिळविले नायट्रोग्लिसरीन आणि नायट्रो सेल्युलोज यांचे मिश्रण होते .

स्फोटक टोपी (Blasting cap)

त्यानंतर त्यांनी स्फोटक टोपी (Blasting cap ) तयार केली. ही टोपी स्फोटकांचा स्फोट घडवून आणण्यासाठी फ्युजनसह एकत्र केलेले असे स्फोटक उपकरण असते.

असे अनेक शोध लावून त्यांचे पेटंटस् त्यांनी मिळविले होते. डायनामाइट चा उपयोग नागरी आणि लष्करी बांधकामासाठी व्हावा अशी त्याची अपेक्षा होती. परंतु त्याचा उपयोग युद्धाच्यावेळी शत्रूचा संहार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर होऊ लागला. आपण लावलेल्या शोधांचा उपयोग मानवाच्या कल्याणासाठी व्हायला पाहिजे असे त्याचे स्पष्ट मत होते.

पुन्हा एक नवीन घटना घडली आणि नोबेल यांनी एक दृढनिश्चय केला. १८८८ मध्ये आल्फ्रेड चा भाऊ फ्रान्सला गेला होता. तिथे त्याचे निधन झाले. फ्रान्समधील वृत्तपत्रांचा असा समज झाला की आल्फ्रेडचेच निधन झाले आणि त्यांनी त्यांच्या वृत्तपत्रात " मृत्युच्या सौदागराचा मृत्यु "या मथळ्याखाली आल्फ्रेड नोबेल च्या मृत्यूची बातमी प्रसिद्ध केली. त्या बातमीत आल्फ्रेड चा उल्लेख लोकांना मारण्यासाठी विविध मार्ग शोधून श्रीमंत झालेली व्यक्ती असा करण्यात आला होता. स्वतःच्याच मृत्यूची बातमी आल्फ्रेडला वाचावी लागली . लोकांची त्याच्याविषयी असलेली मते पण त्याला समजली. खरं म्हणजे आपण लावलेल्या शोधांचा उपयोग शांततेसाठी व्हावा याविषयी आल्फ्रेड आग्रही होता पण तसं घडत नव्हतं. म्हणून त्यांनी एक योजना आखली. अनेक पेटंट त्याच्या नावावर असल्यामुळे त्यांनी आधीच खूप संपत्ती कमावली होती. आपल्या संपत्तीचा उपयोग चांगल्या कारणासाठी व्हावा म्हणून त्यांनी एका विश्वस्त मंडळाची स्थापना केली . मानवतेच्या दृष्टिकोनातून समाजोपयोगी कार्य करणाऱ्या व्यक्तींना या मंडळामार्फत पुरस्कार देण्याचे त्यांनी निश्चित केले. हाच तो नोबेल पुरस्कार ! जगातील सर्वात मानाचा असा हा नोबेल पुरस्कार सन 1901 पासून देण्यास सुरुवात झाली.

नोबेल पुरस्काराचे स्वरूप:

भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र किंवा वैद्यकशास्त्र, जागतिक शांतता, साहित्य, अर्थशास्त्र अशा विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींना प्रत्येक वर्षी हा पुरस्कार दिला जातो.

1901 मध्ये नोबेल पुरस्कार विल्यम रोंटजेन (भौतिक) जेकोब्ज हौफ (रसायनशास्त्र) एमिल बेहरिंग (वैद्यकशास्त्र), सलीं प्रुधोम (साहित्य) आणि शांततेसाठी हेन्री दनांत व फ्रेडरिक पॅसी यांना संयुक्तपणे प्रदान करण्यात आले. साधारणपणे 1. 2 मिलियन डॉलर, प्रशस्तीपत्र आणि मेडल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 1901 पासून आत्तापर्यंत 930 व्यक्ती आणि 25 संस्था नोबेल पारितोषिकाच्या मानकरी ठरल्या आहेत. यामध्ये 13 भारतीयांचा (५ भारतीय नागरिक आणि ८ भारतीय निवासी किंवा भारतीय वंशाचे) समावेश आहे.

भारताचे पहिले नोबेल पारितोषिक विजेते: गुरुदेव रवींद्रनाथ टागोर

गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर (मूळचे नाव) यांनी १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि २० व्या शतकाच्या प्रारंभी बंगाली साहित्यात आणि बंगाली संगीतात बहुमोल कार्य केले त्यामुळे बंगाली साहित्यात आणि संगीतात एक आमूलाग्र बदल घडून आला. १९१३ साली रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले आणि ते भारताचे व आशियातील पहिले नोबेल विजेते ठरले.

कोलकात्यात जन्मलेल्या रवींद्रनाथांनी वयाच्या आठव्या वर्षी पहिली कविता लिहिली. वयाच्या सोळाव्या वर्षी भानूसिंग या टोपण नावाने अनेक कविता लिहिल्या. उच्च दर्जाच्या साहित्याची निर्मिती, संगीत, शांतिनिकेतनची उभारणी हे त्यांचे प्रमुख असे जीवन कार्य! जन गण मन आणि आमार शोनार बंगला या त्यांच्या रचना अनुक्रमे भारत आणि बांगलादेश यांची राष्ट्रगीते म्हणून स्वीकारण्यात आल्या.

नोबेल पारितोषिक विजेते इतर भारतीय मानकरी:

  1. सी व्ही रामन (१९३० /प्रकाशाचे विकिरण)
  2. हरगोविंद खुराणा (१९६८ / शरीर विज्ञान / औषध शास्त्र)
  3. मदर तेरेसा (१९७९/शांतता)
  4. सुब्रमण्यम चंद्रशेखर (१९८३ / भौतिकशास्त्र)
  5. अमर्त्य सेन (१९९८ / आर्थिक विज्ञान)
  6. राजेंद्र चौधरी, IPCC अध्यक्ष (२००७/शांतता/ मानव निर्मित हवामान बदलाविषयक अधिक ज्ञान निर्माण करण्यासाठी व ते प्रसारित करण्याचा प्रयत्न करण्यासाठी आणि अशा बदलांचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपायांचा पाया घालणे.)
  7. व्यंकटरमण रामकृष्णन (२००९ / रसायनशास्त्र)
  8. कैलाश सत्यार्थी (२०१४ / शांतता)
  9. अभिजित बॅनर्जी (२०१९ / आर्थिक विज्ञान)
  10. रोनाल्ड रॉस (१९०२ / शरीर विज्ञान औषध शास्त्र)
  11. रुडयार्ड किप्लिंग (१९०७ / शांतता)
  12. दलाई लामा ( १९८९ / शांतता )

सोल्वे परिषद

१९१२ साली बेल्जियममधील उद्योगपती व रसायन शास्त्रज्ञ अर्नेस्ट सोल्वे यांनी इंटरनॅशनल सोल्वे इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स अँड केमिस्ट्री स्थापन केली तेव्हापासून (१९११) आजपर्यंत त्या विषयांवर परिषदा आयोजित केल्या जातात. त्यातील पाचवी परिषद १९२७ मध्ये 'इलेक्ट्रॉन व प्रोटॉन' यावर घेतली गेली. त्यावेळी नव्यानेच उगम पावलेल्या 'क्वांन्टम' सिद्धांतावर जगातील नामांकित भौतिकशास्त्रज्ञ भेटले. २४/१०/१९२७ ते २९/१०/१९२७ या कालावधीत ही परिषद भरली होती. त्यात अल्बर्ट आईन्स्टाईन, नील्स बोर (Bohr) असे २९ शास्त्रज्ञ उपस्थित होते. ती परिषद खूपच गाजली. त्यातील १७ शास्त्रज्ञांना त्यापूर्वी किंवा नंतर नोबेल पारितोषिक मिळाले. त्या परिषदेत मेरी क्युरी या एकच स्त्री शास्त्रज्ञ होत्या. हायन्सबर्गच्या अनिश्चिततासंबंधी बोलताना आइन्स्टाइन यांनी म्हटले होते की, "देव फासे खेळत नाही". त्यावर नील्स बोर यांनी उत्तर दिले की, "आईन्स्टाईन, काय करावे ते देवाला सांगू नका".


1927 Solvay Conference on Quantum Mechanics.

Photograph by Benjamin Couprie, Institut International de Physique Solvay, Brussels, Belgium. From back to front and from left to right :

Auguste Piccard, Émile Henriot, Paul Ehrenfest, Édouard Herzen, Théophile de Donder, Erwin Schrödinger, Jules-Émile Verschaffelt, Wolfgang Pauli, Werner Heisenberg, Ralph Howard Fowler, Léon Brillouin,
Peter Debye, Martin Knudsen, William Lawrence Bragg, Hendrik Anthony Kramers, Paul Dirac, Arthur Compton, Louis de Broglie, Max Born, Niels Bohr,
Irving Langmuir, Max Planck, Marie Skłodowska Curie, Hendrik Lorentz, Albert Einstein, Paul Langevin, Charles-Eugène Guye, Charles Thomson Rees Wilson, Owen Willans Richardson


या फोटोच्या रुपात या थोर वैज्ञानिकांची, अर्थशास्त्रज्ञांची, साहित्यिकांची ओळख होऊ शकेल. त्यांच्या कार्यापासून भावी पिढीला प्रेरणा मिळून त्यांच्या हातूनही काही मानवतावादी कार्य घडून येऊ शकेल, समाजासमोर एक प्रकारचा आदर्श ठेवणाऱ्या या नोबेल पारितोषिक विजेते यांचा फोटो एकत्रित पाहायला मिळणे म्हणजे सगळ्या देवांचा एकत्र फोटो पाहायला मिळाल्यासारखे आहे.


Download article (PDF)
 


Send us your feedback

* Your name

* Your email

* Your location

A brief message


All diagrams, pictures, tables etc. are from websites on Internet. We are thankful to all these sources.
Vidnyanvahini is a Non-Governmental Organisation (NGO) and this entire write up is for students, teachers and general public, free of charge.
IT IS NOT FOR ANY COMMERCIAL USE.