उंबरफुलाची गोष्ट
मुलांनो, तुम्ही उंबर किंवा पिंपळवृक्षाला फुलं आलेली पाहिलीत का?
उंबर किंवा औदुंबर, वड, पिंपळ, अंजीर, हे वृक्ष "फायकस" किंवा "फिग" ह्या प्रजातीतील विविध जातीत मोडतात.
ह्या वृक्षांना काही ऋतुंमध्ये छोटी, गोल,मऊ लालसर "फळं" लागलेली तुम्ही पाहिली असतील, जी पिकल्यावर जमिनीवर पडतात. मग फळं आहेत पण फुलं दिसत नाहीत असा प्रश्न येतो का मनात? नक्कीच हा प्रश्न बरोबर आहे. आता ह्याचं उत्तर कुठे लपलय ते बघूया.
त्यासाठी आपल्याला फळ कापून त्याची अंतर्रचना बघावी लागेल.
खालील आकृतीत दाखवल्याप्रमाणे फळाच्या आतील पोकळीत असंख्य छोटी फुले आपल्याला दिसतात, शिवाय पिकलेल्या लाल फळात तर बीजं पण दिसतात.
ह्याचा अर्थ ह्या फुलांच परागीकरण पण झालं आहे.
म्हणजेच ह्या छोट्या फुलांचं फलन होऊन अनेक फळं तयार होतात आणि ज्याला आपण फळ म्हणतो त्या फळ- सदृश कुपी (container) मध्ये ती असतात.
कुपीचा रंग इतर फळांप्रमाणे कच्चा असताना हिरवा, मग पिकायला लागलं की पिवळा व लाल असा बदलतो. पिकलेली फळे पक्षी आवडीने खातात.
मुलांनो, आता तुम्हाला कोणी विचारलं की उंबरफूल पाहिलं का? तर तुम्ही सहज म्हणू शकता " हो, फळाच्या आत फुलं!किंवा खरं तर "कुपीत असतात असंख्य छोटी फुलं आणि त्यापासून तयार झालेली फळं"!
फुलांच परागीकरण कीटक करतात हे तुम्हाला माहित आहेच. पण इथे तर फुलं कुपीत बंद आहेत आणि आपण म्हणतो की ह्या छोट्या फुलांच परागीकरण होतं. मग ते कसं होतं हा प्रश्न पडतो का? त्याचंही उत्तर बघूया.
उंबराच्या आतील पोकळीत नर, मादी व नपुंसक अशी तीन प्रकारची फुलं असतात. उंबरमाशी ह्या एका लहान कीटकाची मादी ह्या फुलांपैकी मादीफुलांचे परागीकरण करते आणि स्वतः ची अंडी नपुंसक फुलांमध्ये घालते. त्या अंड्यातून पिल्ले बाहेर येतात, योग्य वाढ होऊन त्यातील मादी उंबरमाश्या बाहेर पडतात व इतर उंबरांत जाऊन पुन्हा हे जीवन चक्र सुरू ठेवतात.
असे करताना उंबरमाशी दोन गोष्टी साध्य करते. स्वतःची प्रजाती वाढवते व उंबरफुलांच परागीकरणही करते. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.
निसर्गातील भिन्न प्रकारच्या सजीवांच्या परस्परांतील अवलंबनाचे हे एक ठळक उदाहरण आहे.
Back to 'कुतूहल' page
'कुतूहल' या सदरातील इतर लेख
-
अंडे फोडायची पैज
9 Aug. 21
-
उभे राहून दाखवाल?
27 Aug. 21
-
काजवे का व कशामुळे चमकतात?
9 Sept. 21
-
उंबरफुलाची गोष्ट
24 Sept. 21
-
पोहता येत नाही? नो प्रॉब्लेम!
11 Oct. 21
-
वृक्ष वाचवा
21 Oct. 21
-
पाण्याचे फुगे का होत नाहीत?
9 Nov. 21
-
फुग्यांचा खेळ आणि बर्नोलीचा नियम - भाग 1
20 Nov. 21
-
बर्नोलीचा नियम - भाग 2
6 Dec. 21
-
इंद्रधनुष्य: बरेच काही - भाग 1
27 Dec. 21
-
इंद्रधनुष्य: बरेच काही - भाग 2
18 Jan. 22
-
मुंग्यांचे जग
7 Feb. 22
-
भोवरा कसा फिरतो?
8 March 2022
-
दिड किलोची अद्भूत बाब!
5 April 2022
-
मेंदू- भाग-२
8 May 2022
Send us your feedback
Kiran Phatak
email: ka704phatak[at]gmail.com
Vidnyanvahini
Postal Address:
'Rangdeep' plot 20, lane 10
Natraj Housing Society
Karvenagar, Pune 411052