Our new initiatives: 'कुतुहल' | असे कां आणि कसे? | Home | About us | Contact us | youtube

Vidnyanvahini

अंडे फोडायची पैज

9 Aug. 2021 •

एकदा दोन मित्रांमध्ये पैज लागली.

पैज होती अंडे फोडण्याची!

त्यासाठी त्यांना एक अंडे हवे होते. त्यांच्या सुदैवाने घरात अंडी आणलेलीच होती.

काय होती पैज?

The egg

चित्र 1

पहिल्या चित्रात दाखवल्याप्रमाणे दोन्ही हातात अंडे आडवे धरायचे आणि दोन्ही हातांनी ते दाबून फोडायचे. चित्र आहे ते आधी नीट बघा.

अंडे खूप खूप दाबून बघितले का? फुटतय का ते?

नाही फुटले?

असं का बरं होतंय?

आता दुसरं चित्र बघा.

अंडे न फुटण्याचे कोडे खालिल चित्राच्या आधारे सुटेल आपल्याला.

The arc

चित्र 2

ह्या दुसऱ्या चित्रात दाराच्या वरच्या बाजूने लावलेल्या विटांचा आकार जरा वेगळा आहे, म्हणजे त्या साधारण गोलाकारात आहेत. अशा आकारामुळे विटांच्या वरुन दाब आल्यास ते बल गोलाकार विटांच्या दोन्ही बाजूला चित्रात दाखवल्याप्रमाणे विभागून बाजूला जाते. त्यामुळे वरतून सरळ खालच्या बाजूला दाबाचा परिणाम होत नाही, अगदी वरचा दाब खूप वाढवला तरी!

अशीच काहीशी क्रिया, आपण जे अंडे पहिल्या चित्रात दाखवल्याप्रमाणे फोडण्याचा प्रयत्न केला, त्या अंडयाच्या बाबतीत होते, म्हणून हे अंडे आपल्याला फोडता येत नाही.

गमतीचा भाग म्हणजे अशा गोलाकार विटांना खालच्या बाजूने बल लावल्यास त्या फुटू शकतात!

अंडयाच्या बाबतीतही, अंडयाच्या आतले पिल्लू अंडयातून बाहेर पडण्यासाठी अंडयाचे कवच आतून सहजी फोडून बाहेर येऊ शकते!

The arc is the strongest structural shape, and in nature, the sphere is the strongest 3-d shape. The reason being is that stress is distributed equally along the arc instead of concentrating at any one point.



All diagrams, pictures, tables etc. are from websites on Internet. We are thankful to all these sources.
Vidnyanvahini is a Non-Governmental Organisation (NGO) and this entire write up is for students, teachers and general public, free of charge.
IT IS NOT FOR ANY COMMERCIAL USE.