Vidnyanvahini
 

Recent camps

विज्ञानवाहिनी, पुणे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिबिर

गेल्या कित्येक वर्षांपासून विज्ञानवाहिनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी जूनच्या महिन्यामध्ये एक शिबीर चालवित आहे. या विद्यार्थ्यांच्या जीवनातील कक्षेबाहेरच्या आणि नाविन्यपूर्ण अशा विविध विषयांचा आणि घडामोडींचा परिचय त्यांना करून द्यावा जेणेकरून त्यांचा दृष्टीकोन व्यापक व्हावा हा या शिबीराचा उद्देश असतो. पाच दिवस चालण्याऱ्या या शिबिरात विज्ञानवाहिनीने भेट दिलेल्या ग्रामीण शाळांतील निवडक विद्यार्थ्यांचा समावेश असतो. विविध विषयांतील तज्ञांची संभाषणे, पुण्याच्या आसपास असलेले कारखाने व राष्ट्रिय संस्था यांना भेटी असा भरगच्च कार्यक्रम शिबिरात असतो.

या शिबिरांना मिळणारा प्रतिसाद पाहून गेल्या तीन वर्षापासून दोन शिबिरे विज्ञानवाहिनीने घ्यायची प्रथा चालू केली आहे. यातील पहिल्या शिबिरात एका वर्षी अरुणाचल प्रदेश आणि दुसऱ्या वर्षी नागालॅंड मधील शाळांतील विद्यार्थ्यांना आमंत्रित केले होते. यावर्षी कोल्हापूरमधील Helpers of the Handicapped या संस्थेतील दिव्यांग मुलां/मुलींना शिबिरात सहभागी होण्याची संधी दिली आहे. हे शिबिर २८ मे ते ३ जून या दरम्यान घेतले गेले व त्यातील ठळक कार्यक्रम असे होते:

या शिबिरादरम्यान असं जाणवलं की ही संधी मिळाल्याने विद्यार्थी भारावून गेले होते. उदाहरणार्थ गणेश करे-पाटिलांनी एडिसन, हेलेन केलर, इ. विविध दिव्यांग व्यक्तीनी त्यांच्या व्यंगावर मात करून यश कसं मिळवलं हे जेव्हां त्यांच्या प्रभावी भाषणात सांगितलं तेव्हां अनेक विद्यार्थी उत्स्फ़ुर्तपणे पुढे आले आणि स्वत:च्या आशा-आकांक्षा विषयी बोलू लागले. त्यातील एका मुलीने आपल्या आईने तिच्यासाठी केलेल्या प्रयत्नांचं वर्णन करताना तिला आणि प्रेक्षकानांही भावना आवरणं कठीण झालं. असेच हृदयस्पर्शी प्रसंग गौरी गाडगीळ आणि तिच्या आईशी बोलताना आणि समारोपाच्या वेळी सर्वांना आले. या मुलांसोबत आलेल्या शिक्षिका सौ. विभावरी सावंत यानी शिबिराविषयी व्यक्त केलेल्या लेखी प्रतिसादातील एक उतारा :

”... खूप गोष्टी नव्याने समजल्या. आमच्या ज्ञानात भर पडली . सर्व व्याख्यानांबाबत बोलायचे झाले तर माझ्याकडे शब्द अपुरे आहेत. प्रत्येक वक्ता आपल्या ज्ञान आणि अनुभवाची शिदोरी आम्हाला वाटत होते. एवढ्या अनुभवी, ज्ञानी मंडळीना पाहून मुलांसोबत आम्हालाही नवा दृष्टीकोन लाभला...” (पूर्ण प्रतिसाद)

यानंतरचे दुसरे शिबिर १८ जून ते २२ जून या अवधीत घेतले जाईल. या शिबिरात गेल्या वर्षी विज्ञानवाहिनीने भेट दिलेल्या ग्रामीण शाळांतील निवडक विद्यार्थी व विद्यार्थिनी भाग घेतील. शिबिरातील ठळक कार्यक्रम असे: